Share

यांच्या कुटुंबाला 300 कोटींचं कर्ज दिलंय; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरु केलेले भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका नेत्याला धारेवर धरलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला तब्बल 300 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कथित घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला पुन्हा एकदा ऊत येणार असून, सोमय्यांनी आता नांदेड आणि धर्माबादला जाण्याचा इशारा दिला आहे.

आयकर खात्याने आज पुन्हा नांदेड, धर्माबाद शाखेत छापा मारला आहे. अशोक चव्हाण कुटुंबाला 300 कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असा खळबळजनक दावाही सोमय्यांनी केला. याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण नांदेड, धर्माबादला जाणार आहोत. बुलढाणा अर्बन नागरी पतपेढीचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावरही आज जोरदार टीका केली. ‘आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे आणि तिकडे अर्जुन खोतकर हिरवे झाले आहेत. याचाही पाठपुरावा मी करणार आहे. जनतेला या घोटाळेबाजांचा हिशोब पाहिजे. उद्धव ठाकरेंकडे अर्जुन आहेत, त्यांना पैसे हवे आहेत’, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!