Share

३० टक्के टॅक्स म्हणजे निव्वळ वसूली; हे मोदी नव्हे ‘लोभी’ सरकार-पी.चिदंबरम

Published On: 

नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. ग्राहक पेट्रोलसाठी १०२ रुपये मोजत आहेत. यातील ४२ रुपये तेल कंपन्यांना, केंद्र सरकारला ३३ रुपये, राज्य सरकारला २४ रुपये कर म्हणून दिले जातात. त्याच वेळी, ४ रुपये देखील डीलरकडे जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

‘करांच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर ग्राहकांच्या खिशातून केंद्र सरकार जबरदस्तीनं वसुली करत आहे’, अशा शब्दांत चिदंबरम यांन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोलच्या किंमतीच्या एक तृतियांश भाग हा केंद्र सरकारचा कर आहे. एखाद्या वस्तूवर ३३ टक्के कर लादणं ही जबरदस्तीनं वसुली करण्यासारखेच आहे, असे ते म्हणाले. जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असताना चिदंबरम यांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे.

इंधनांच्या वाढलेल्या किंमतींवरून चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर वसुलीचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आत्तापर्यंतचं सर्वात ‘लोभी सरकार’ असल्याची टीकाही त्यांनी केलीय. जर एखाद्या ग्राहकाने पेट्रोलसाठी १०२ रुपये प्रति लिटर दिले तर ४२ रुपये तेल कंपन्यांना जातात. ३३ रुपये केंद्र सरकारकडे जातात आणि २४ रुपये राज्य सरकारकडे कर म्हणून जातात. १०२ रुपयांपैकी ३३ रुपये म्हणजे ३३ टक्के आहेत. माझ्या मते ती खंडणी आहे,असे चिदंबरम म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!