Share

नाशकात आढळले डेल्टा व्हायरसचे 30 रुग्ण

Published On: 

नाशिक: जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 30 रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा रुग्णालयाचे डॉ.किशोर श्रीनिवास यांनी सांगितले आहे. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होये.त्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.त्यामुळे डेल्टा प्लसच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान यानंतर श्रीनिवास यांनी परिसरातील लोकांना सावधगिरी तसेच स्वच्छता, मास्क आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्याचे म्हटले आहे.

यापैकी बहुतेक रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. २ रुग्ण गंगापूर आणि इतर नगरचे आहेत. अनेक रुग्ण सिन्नर, येवला, नांदगाव या भागातील असल्याचे कळते आहे. त्यामुळे अधिकची खबरदारी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अजूनही वाढतच असताना दुसरीकडे डेल्टा प्लसच्या रुग्णांतही वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्यावर हे नवीन संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!