Share

बीड बायपासवर ३०किमी वेगमर्यादा; अपघात रोखण्यासाठी वाहतुक पोलीसांचे आदेश

Published On: 

औरंगाबाद : शहरातील बीड बायपास रोडवरील अपघाताचे सत्र थांबवण्यासाठी औरंगाबाद शहर वाहतूक पोलीसांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. बीड बायपास रोडवरील सर्वप्रकारच्या वाहनांची वेग मर्यादा प्रति तास ३० किमी एवढी ठेवण्याचे आदेश औरंगाबाद शहर वाहतुक पोलीसांनी दिले आहे.

शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असणारा म्हणजे बीड बायपास रोड. या रोडवर अनेकदा अपघात घडत असतात. या रस्त्यावर २६ ते २९ जानेवारी दरम्यान काही अपघात झाले. या अपघातांत चार जणांचा बळी गेला. या अपघातांची दखल गांभीर्याने घेत सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बीड बायपासची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी या रोडवरील वाहनांचा वेग कमी करण्याचा घेतला. या निर्णयानुसार महानुभाव आश्रम चौक ते गुरू लॉन्सपर्यंत दुचाकी, चारचाकींसह सर्व प्रकारच्या जड वाहनांची वेग मर्यादा प्रति तास ३० किमी एवढी राहील.

बुधवारी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी हे आदेश जारी केले. वेग मर्यादेचे फलक लावण्यासाठी वाहतूक शाखेने जागतिक बँकेला पत्र पाठवले आहे. काही दिवसांत वेग मर्यादेचे फलक लावले जातील. तोपर्यंत वाहतूक कर्मचारी सुसाट वाहनांवर लक्ष ठेवणार आहेत. फलक लावल्यानंतर दोन स्पीडगनद्वारे सुसाट जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. दरम्यान, हा नियम अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका, पोलिस व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू असणार नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!