🕒 1 min read
मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी गंभीर आरोप केलेत. काही वेळांपूर्वीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलं. त्यानंतर एनसीबीनं ही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच NCB चे एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे.
एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरु आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे.
NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत आहे. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यांत 8 जणांना अटक करण्यात आली. 9 साक्षीदार होते. अटक करण्यात आलेल्या लोकांना NCB कधीच ओळखत नव्हती. 2 तारखे आधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हती. तसंच आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते, असंही एनसीबीनं स्पष्ट केलं आहे. कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एनसीबीनं पत्रकार परिषदेत दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुभाष देसाईंनी राणेंचं नाव घेतलेच नाही तर देशातील पहिल्या स्थानावरचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख’
- राणे-ठाकरे एकाच मंचावर; शेजारी बसूनही एकमेकांकडे पाहिलेही नाही
- मोहम्मद नबीच्या नावे आयपीएल सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम
- ‘उद्घाटनाच्या वेळेला कोणतेही राजकारण करणार नाही’, नारायण राणेंकडून तलवार म्यान
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले’, भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
