औरंगाबाद : शहरी भागात कोरोना आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात मात्र अद्याप रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. आजघडीला जिल्ह्यात एकूण २४२ एक्टिव्ह कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक १०० रुग्ण एकट्या वैजापूर तालुक्यात आहेत.
शहर परिसरात कोरोनाने काढता पाय घेतल्याचे चित्र आहे. दैनंदिन १० ते २० च्या संख्येत रुग्ण शहरी भागात आढळत आहेत. मात्र ग्रामीण भाग अद्याप कोरोनाच्या विळख्यात असल्याचे दिसत आहे. गुरुवार, २२ रोजी जिल्ह्यात एकूण २४२ एक्टिव्ह रुग्ण असल्याची आकडेवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक १०० रुग्ण वैजापूर तालुक्यातील आहेत. गुरुवार रोजीच सर्वाधिक ७ पॉझिटिव्ह रुग्ण वैजापुरातच आढळून आले असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अधिक गरजचे झाले आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण १९ पोहिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडली. यात कन्नड, आणि वैजापुरात प्रत्येकी ७ तर गंगापूर व पैठण तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले. तर सोयवगात केवळ एक रुग्ण सापडला आहे. याखेरीज औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५९८२६ झाली आहे.
वैजापूर अलर्ट मोडवर !
जिल्ह्यात एकूण २४२ एक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असून, वैजापूर १००, गंगापूर ४३, पैठण ३७, कन्नड २७, औरंगाबाद १४, सिल्लोड १०, खुलताबाद ६ आणि फुलंब्री तालुक्यात ५ रुग्ण उपचार घेत आहेत. सोयगावात मात्र एकही रुग्ण उपचार घेत नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. आजपर्यंत एकूण ५८ हजार ४५ रुग्ण उपचारांती बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार ‘स्मार्ट’; मुंबईसह प्रमुख महानगरांत बसविले जाणार स्मार्ट मीटर
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

