Share

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा आयपीएल बाबतीत बडा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २००८ पासून भारतात क्रिकेट वेड्या रसिकांसाठी बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. टी-२० प्रकारात खेळला जाणारी हि स्पर्धा अल्पावधीतच यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. भारताने पहिला वाहिला टी-२० विश्वकरंडक २००७ मध्ये पाकिस्तानला पराभूत करून जिंकला. त्यामुळे बीसीसीआयने भारतात टी-२० क्रिकेट अजून लोकप्रिय होण्यासाठी २००८ पासून इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. सलग ११ वर्षे यशस्वी आयोजन केल्यानंतर २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएल चे गणित काही प्रमाणात बिघडले.

२०२० आणि २०२१ या दोन वर्षात आयपीएलचे बहुतांश सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आले होते. या वर्षी पण भारत देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आणि ओमायक्रॉन विषाणूच्या थैमानामुळे आयपीएल स्पर्धा पुन्हा देशाबाहेर दक्षिण आफ्रिका किंवा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा विचार भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) करत होत, मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या बाबतीत एक बडा खुलासा केला आहे. २०२२ च्या आयपीएल स्पर्धेसाठी दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव पार पडणार आहे.या मेगा लिलावासाठी ३७० भारतीय खेळाडूंसह एकूण ५९० खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या  १५ व्या हंगामाची तयारी जोरात सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यंदाच्या हंगामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बीसीसीआयने अहमदाबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नवीन संघांची भर घातली आहे. त्यामुळे ही स्पर्धा नेहमीपेक्षा आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे. २०२२ आयपीएल साठी लिलाव होत असतानाच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यंदाच्या वर्षीची स्पर्धा संपूर्णपणेच भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतीत अधिक माहिती देताना  सौरव गांगुली म्हणाले की, ‘आम्हाला आयपीएल २०२२ पूर्णपणे भारतात आयोजित करायचे आहे.

कोविड-१९ ची परिस्थिती नियंत्रणात राहिली, तर ही लीग भारतातच आयोजित करण्यात येणार आहे’. सौरव गांगुली यांनी साखळी सामने महाराष्ट्रातच म्हणजेच पुणे आणि मुंबई या दोन शहरातच खेळण्यात येतील असे सांगितले आहे तर बादफेरीचे सामने कुठे खेळवायचे याचा निर्णय आम्ही नंतर घेऊ असे सांगितले आहे.

        महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!