औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आजपासून आणखी 20 बसेस नऊ मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे शहर बसची संख्या आता 50 पर्यंत पोहोचणार आहे. अशी माहिती स्मार्ट शहर बस कार्यालयाने दिली. तसेच विध्यार्थी पासेस आणि विविध सवलती योजनांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. सिडको बस स्थानक, औरंगपुरा आणि रेल्वे स्टेशन येथे पास विक्री केंद्र सुरू आहेत.
असे आहे नवीन मार्ग :
- रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉईंट मार्गे – शासकिय तंत्रनिकेतन, सूतगिरणी चौक, पुंडलिक नगर, सिडको
- औरंगपुरा ते रांजणगाव मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक
- सिडको ते घाणेगाव मार्गे – रांजणगाव, मायलन
- सिडको ते विद्यापीठ मार्गे – औरंगपुरा, लक्ष्मी कॉलनी
- सिडको ते रेल्वे स्टेशन मार्गे – 7 हिल, छत्रपती शिवाजी नगर, बाय पास
- सिडको ते बजाजनगर मार्गे – सिडको महानगर 1, वडगाव कोल्हाटी
- रेल्वे स्टेशन ते रेल्वे स्टेशन मार्गे – 7 हिल, सेंट्रल नाका, चिस्तीया पोलीस चौकी, बजरंग चौक, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर, शहागंज, मध्यवर्ती बस स्थानक
- सिडको ते औरंगपुरा मार्गे – एम 2, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक, सावरकर चौक
- मध्यवर्ती बस स्थानक ते करमाड मार्गे – सिडको बस स्थानक, चिकलठाणा, शेंद्रा, लाडगाव
महत्वाच्या बातम्या
- …तर ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
- ‘अशोक चव्हाणांचे रक्त मराठ्याचे नाही, ते मराठाच नाहीत’
- अजित पवारांचं रक्त सळसळत नाही का ? नरेंद्र पाटलांची बोचरी टीका
- ‘सुरक्षा हटवल्याबद्दल आभार ! राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी’
- हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही… वर्णद्वेषावरून कोहलीनं ऑस्ट्रेलियाला खडसावलं

