🕒 1 min read
नांदेड: केंद्रीय राज्य मार्ग निधी अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खा.चिखलीकरांनी केलेल्या मागणीनुसार १९६ कोटी २० लाख ३४ हजार रुपयांचा निधी दिला आहे. जिल्ह्यातील रस्ते सुंदर व्हावेत, या रस्त्यावरुन सुखकर प्रवास व्हावा, यासाठी नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मध्यंतरी भेट घेवून जिल्ह्यातील काही रस्त्यांचा केंद्रीय राज्य मार्गात समावेश करावा व त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती.
या निधीतून अर्धापूर तालुक्यातील पाटनूर-जांभरुण- दाभड- बामणी- कामठा- मालेगाव ,देगाव कु-हाडा रस्ता, भोकर तालुक्यातील गारगोटवाडी – नसलपूर- नेकाली ब्रिज -भुरभुशी – किनी- नांदा- गोरणटवाडी- दिवशी तांडा- कांडली- लगळूद- रावणगाव- मातूळ- खडकी ते शिवनगर तांडा रस्ता, नांदेड तालुक्यातील विष्णूपुरी – पांगरी- असदवन-गोपाळचावडी-तुप्पा रस्ता, बिलोली तालुक्यातील कुंभारगाव-कुंडलवाडी-नागणी ते राज्य रस्ता, देगलूर तालुक्यातील देगलूर-करडखेड-हानेगाव ते कर्नाटक सीमा रस्ता, हिमायतनगर तालुक्यातील छोटा पुल अर्धापूर-तामसा व इतर रस्त्यांचा समावेश आहे.
यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १९६ कोटी २० लाख ३४ हजार रुपयांचा निधी नांदेड जिल्ह्यासाठी दिल्याने नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व आ.केराम, आ.राठोड, आ.राजेश पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या निधीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्राच्या मदतीसाठी गडकरींचा पुन्हा पुढाकार; आंध्र प्रदेशकडून मिळणार ३०० व्हेंटीलेटर्स !
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार
- चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? पटोलेंचा सवाल
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
