Share

१७ वर्षीय विद्यार्थ्याने दिल्ली गाठत घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट; आत्मविश्वास असेल तर ‘दिल्ली’ दूर नाही!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : एकीकडे राजकीय क्षेत्रात घराणेशाहीला वाव असल्याच्या वावड्या उठत असतांना दुसरीकडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना देखील जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एकट्याने रेल्वे प्रवास करत भराडी येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.
नवनियुक्त मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांना भेटून अभिष्टचिंतन करणारा सतरा वर्षीय विद्यार्थी निवृत्ती सपकाळ होय. कमी वय असलेल्या परंतु समाजसेवेचे, राजकारणाचे वेड असलेल्या निवृत्तीचे मंत्रीमहोदयांनी कौतुक करीत भविष्यात जनसेवा करण्यास शुभेच्छा दिल्या. शिवाय मदत लागेल तेव्हा संपर्क करा म्हणून विश्वास दिला.

आपल्यावर प्रभाव असलेला नेत्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणे म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यास आनंद होणारच. अशी लॉटरी लागताच नेतेगण असतील तेथे भेटून अभिनंदन करण्याची चढाओढ, उत्सुकता आलीच. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व खांदेपालट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार १५ ऑगस्टपर्यंत कुठल्याही मंत्र्यांना गावाकडे किंवा मतदारसंघात न येता जास्तीत जास्त वेळ संबंधित मिळालेल्या खात्याच्या माहितीसाठी करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

निवड झालेल्या मंत्र्यांना भेटण्यासाठी नातेवाईक, कार्यकर्त्यांनी दिल्लीला धाव घेतली. कुणी विमानाने, कुणी रेल्वेने तर कुणी कशाने परंतु भेट गरजेचे मानून रवाना झाले. काहींची आर्थिक स्थिती तोला मोलाची असली तरी वेळ, पैसा समायोजन करून जाणे आलेच. असेच नुकतेच ११ वी उत्तीर्ण झालेल्या १६ वर्षीय निवृत्ती नावाच्या राजकीय छंद असलेल्या विद्यार्थ्यांचे झाले.

प्रत्यक्ष ओळख असलेल्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीपद तर रावसाहेब पाटील दानवे यांना देखील रेल्वे खाते देण्यात आल्याने अनेकजण भेटायला जात आहेत. आपणही त्यांना भेटायला गेले पाहिजे या हेतूने निवृत्त सपकाळनेही रेल्वे पकडत दिल्ली गाठून पदाधिकारी मंडळींची भेट घेत समाधान मानले. दोन्ही नेत्यांनीही निवृत्तीची आस्थेवाईकपणे विचारपूस करत दोन दिवस संसद आणि दिल्ली दाखविण्यास सहकार्य केले. मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर दिल्ली देखील दूर नाही असे सतरा वर्षीय निवृत्ती सपकाळच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!