Share

प्रियकराच्या आत्महत्येनंतर, १५ दिवसांनी प्रेयसीची आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने तणावातून १७ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.१९ रोजी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, खुशी रमेश कलवले वय १७ रा.गायकवाड हौसिंग सोसायटी एकता नगर जाटवडा रोड असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.खुशी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.तर गेल्या काही दिवसांपासून पार्लर काम करत होती. खुशीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी घरच्यांचे एकमत करून तीन महिन्यापूर्वी विवाह ठरवला होता.मात्र विवाह ठरलेल्या तरुणाने १५ दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. यामुळे खुशी पंधरा दिवसांपासून तणावात होती.

दरम्यान शनिवार दि.१९ रोजी दुपारी आई घरा बाहेर दळण करत असताना खुशीने स्वयंपाक घरात सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.ही बाब आईच्या लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने खुशीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला.मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!