लातूर: एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे महागाईचे संकट आणि अशा परिस्थितीत देखील अनेक रुग्णालयांना रुग्णांच्या तब्येतीपेक्षा पैसा महत्वाचा आहे असे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील एकूण १४ कोविड रुग्णालयांनी उपचार केलेल्या रुग्णांकडून तब्बल २३ लाख ७१ हजार १०१ रुपये एवढी अगावची रक्कम बिलांतून आकारल्याचा प्रकार लेखापरीक्षणाच्या अहवालातून समोर आला आहे. उपचार घेतलेल्या रुग्णांना जास्तीची आकारलेली रक्कम परत दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
खाजगी कोविड-१९ रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांवर जास्तीची बीलाची आकारणी होणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कोविड रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती केली होती. लेखापरिक्षकांनी १४ रुग्णालयांनी २३ लाख ७१ हजार १०१ रुपये जादा आकारल्याचा अहवाल दिला आहे. ती रक्कम संबंधित रुग्णास परत करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना कळविण्यात आले आहे.
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नोडल अधिकारी व ऑडिटर यांची नेमणूक केलेली आहे व त्यांचे दूरध्वनी क्रमांक हॉस्पिटलचे रिसेप्शन व नोंदणी काऊंटरच्या ठिकाणी दर्शनी भागात सर्वांना दिसतील अशा रितीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोंदणीत असलेल्या काही हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य मित्रांची नेमणूक केलेली आहे. रुग्णांनी बिलासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित हॉस्पिटलचे ऑडिटर यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

