Share

हिंगोली जिल्ह्यासाठी ११ हजार २०० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

Published On: 

हिंगोली : कोरोना प्रतिबंधक लस खुप सुरक्षित आहे. १ मेपासून सुरु होणाऱ्या सर्वसमावेश लसीकरणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याची नागरिकांना लसीकरणाची गरज लक्षात घेवून ११ हजार २०० प्रतिबंधक लस उपलब्ध केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मराठवाड्यामध्ये तसेच हिंगोली जिल्हाभरात खुप मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारी खुप मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत याबाबतचा आढावा देखील घेतला. हिंगोली जिल्ह्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करुन आवश्यक त्या प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

त्यानुसार विभागीय उपायुक्तांना निर्देश देण्यात आले आहे. आणि यावर तात्काळ १० हजार कोविशील्ड आणि १ हजार २०० कोवॅक्सीन असे एकूण ११ हजार २०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोना प्रतिबंधक लसीबाबत देशातील जनतेमध्ये भिती आणि शंका देखील आहेत. याबाबत जनजगृती करून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी या वेळी केले.

महत्त्वाच्या बातम्या       

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!