Share

“शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका

Published On: 

मुंबई : गोवा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलाच कलगीतूरा रंगल्याचे दिसून येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा गोव्यात एक सरपंचसुद्धा नाही, बाहेरुन आलेल्या पक्षांनीएकदा गेल्या निवडणूका आठवून पहाव्यात, असे सावंत म्हणाले आहेत.

पुढे सावंत म्हणाले, अन्य राजकीय पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा काळ आता संपला. कोरोना काळात प्रकल्पांची उद्घाटने राहिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुका आता जाहीर होणे अपेक्षित असताना ही उद्घाटने होत आहेत. ‘गोवा प्रगती’ कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या विभागाने केलेली कामे आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहोत. इथे डबल इंजिन सरकार आहे. केंद्रात मोदींजींचे सरकार आणि राज्यातही भाजपचे सरकार येणार असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

आत्मनिर्भर भारत स्वयं पूर्ण गोवा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला तो परत एकदा लोकांकडे घेऊन जाणार आहे. गोवा मुक्तीनंतरच्या ६० वर्षांच्या इतिहास जितका विकास झाला नाही तितका डबल इंजिन सरकारने केला आहे. तो लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. आमचे रिपोर्ट कार्ड तयार आहे. आम्ही केलेली कामे लोकांपुढे घेऊन जाणार आहोत, असेही प्रमोद सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!