Share

अभिनेत्री स्वरा भास्करची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; पोस्ट झाली व्हायरल

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातच नव्हे तर देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच बॉलीवूड सेलिब्रेटी अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोरोना (COVID-19) झाल्याचे सांगितले आहे.

दरम्यान स्वरा भास्करने सोशल मीडिया पोस्टद्वारे कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ‘आताच माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट (test results) आला आणि माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मला ताप आला आहे, चव गेली आहे आणि प्रचंड डोके दुखत आहे. माझे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यामुळे मी लवकर बरी होईन अशी आशा करते. घरात रहा सुरक्षित रहा’ या आशयाची पोस्ट स्वरा भास्करने केले आहे.

स्वराला प्रतिष्ठित सोहो लंडन इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Soho London Independent Film Festival) स्वरा भास्करला ‘शीर कुर्मा’ (‘Sheer Qorma’) मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. स्वराने या चित्रपटात सिताराची भूमिका साकारली आहे, जी एलजीबीटी संबंधांवर आधारित आहे. देशात कोरोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. महत्वाचं म्हणजे देशात सात महिन्यानंतर पहिल्यांदाच एक लाखाहून जास्त केसेस आल्या आहेत. याआधी ६ जूनला एक लाख रुग्ण आढळले होते.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!