औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘एक खिडकी योजना‘ व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया‘ राबवण्यात आली. याचा फायदा यंदा झाला आहे. ११ देशातील १०७ विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध विभागात अध्यापन, संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे.
मध्यपूर्व अशिया देशातील विदेशातील विद्यार्थ्यांच्या पुर्वी औरंगाबादेत शिक्षणासाठी मोठा ओढा होता. दरम्यान मध्यतंरीच्या काळात विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘एक खिडकी योजना‘ तसेच ‘प्रवेश ते निकाल‘ पर्यंतची संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबवण्याचा निर्णय घेतला होता. ‘विदेशी विद्यार्थी कक्ष‘ च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया मोहिम राबवण्यात आली. २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षात एकुण ११ देशातील १०७ विद्यार्थ्यांनी विविध विभागात तसेच संशोधनासाठी प्रवेश घेतला. यामध्ये सर्वाधिक १०७ जण हे येमेनचे आहेत. तसेच अफगाणिस्तान, कांगो, इराक, सीरीया, जॉर्डन, नेपाळ व सुदान या देशातील प्रत्येकी १ विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला. तर सोमालियाचे तसेच थायलंड मधील दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती विदेशी विद्यार्थी कक्षाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी दिली आहे.
आता विदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश चांगल्या संख्येने प्रवेश घेतल्याने पुन्हा विद्यापीठामधील प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. तर विविध विषयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण सेवा चांगली देण्याबाबत देखील संबंधीत विभागामधील प्राध्यापक तसेच इतर बाबतीत बैठका घेवून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याबाबत सुचना देखील केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
