Share

५ दिवसांत १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित!- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असून यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. तसेच त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार यांनी ५ दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदार कोरोनाबाधित झाल्याची चिंताजनक माहिती यावेळी दिली आहे.

यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,’कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार आहे.’ तसेच आत्तापर्यंत १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी(K.C.Padvi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आज ५ दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदार कोरोनाबाधित झाल्याची माहिती दिल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!