औरंगाबाद : महापालिकेला जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी पहाटे ७ हजार लसी मिळाल्या होत्या. मात्र जवळपास चार तासांमध्येच त्या संपल्याने आजपासून पुन्हा एकदा लसीकरण बंद राहणार आहे. त्यासोबतच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास १ लाखांच्या जवळपास पोहचल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची चिन्हे आहेत. लसींच्या पुरवठ्यात वरिष्ठ पातळीवरुन नेमक्या अडचणी का येत आहेत हे सांगता येणार नाही. मात्र ऑगस्टपर्यंत लसीकरण पुन्हा सुरळीत सुरू होईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या महिन्यापासून तुटवडा आहे. महापालिकेला एका आठवड्यासाठी शासनाकडून पाच ते दहा हजार लसींचा पुरवठा केला जात आहे. लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्रांवर रांगा लागत आहेत. ८४ दिवसांपूर्वी लस घेतलेल्या अनेकांच्या दुसऱ्या डोसची तारीख येत आहे. अनेकांची तर दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आता एक लाखांवर जाऊन पोहोचली आहे.
मात्र पुरवठा होत नसल्याने एवढ्या मोठ्या संख्येला दुसरा डोस पालिका कसा देणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, राज्यशासन लसींच्या पुरवठा कुठे आणि किती करायचा याबाबत निर्णय घेत असते. त्यामुळे पुरवठा कधी होईल, किती होईल याबाबत मनपा सांगू शकत नाही. दुसऱ्या डोसची वेटिंग वाढली असली तरीही कुणाला काही त्रास झालेला नाही. मात्र ऑगस्टपर्यंत परिस्थिती बदलेल आणि लसीकरण सुरळीतपणे सुरू देखील होईल अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- पुढच्या २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
- डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल
- कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट ‘कॅप्टन इंडिया’, हंसल मेहता करणार दिग्दर्शन
- जलयुक्त शिवारच्या कामात चूक झाली असेल तर त्याची चौकशी करा – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

