नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता जोमाने वाढ होत आहे. आज कोरोनग्रस्तांचा आकडा 50 हजारहून अधिक गेला आहे. तर दिवशी नव्याने सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही हजारच्या घरात गेली आहे. त्यामुळे कोरोना वाढीचा ग्राफ हा आता सर्वोच्च स्तरावर गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांच्या संख्या 52 हजार 952 आहे. तर, आतापर्यंत 1783 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 902 आहे आणि आतापर्यंत 15 हजार 266 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र 15 एप्रिलपासून कोरोनोचा ग्राफ धक्कादायक पद्धतीनं वाढत आहे.

गेल्या 15 एप्रिल पासूनचा ग्राफ पाहिला असता असे दिसून येते की, 15 एप्रिल ते 22 एप्रिल या 8 दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारहून 20 हजारांवर गेली. तर, 23 एप्रिल ते 29 एप्रिल या 7 दिवसांत हा आकडा 30 हजारांच्यावर गेला. यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढताना दिसला. 30 एप्रिल ते 3 मे या 4 दिवसांत भारतानं 40 हजारांचा आकडा पार केला. तर, धक्कादायक म्हणजे गेल्या 3 दिवसांतच कोरोनाचा आकडा आता 50 हजारांवर गेला.
जगात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार भारत आता 15व्या स्थानी आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यामुळं जगातली खराब परिस्थिती असलेल्या देशांमध्ये भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : विशाखापट्टणम येथे वायू गळती, 8 जण दगावले तर 200 जणांची प्रकृती गंभीर
नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला एकत्र केंद्राकडे जाऊ, आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या!
अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

