पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. सोमवारी एका दिवसात 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारी नुसार पहिल्यांदाच एवढे जण एकाच वेळी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.निगडी, प्राधिकरण, आकुर्डी भागात सर्वाधिक रुग्ण असल्याने हा भागात कडक नियम ठेवले आहेत.
#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात
पिंपरी चिंचवडमध्ये शहरातील 22, तर शहराबाहेरील 2 रुग्ण काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 226 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 91 जणांवर उपचार सुरु आहेत. कालच्या दिवसात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत शहरातील 131 रुग्ण, तर शहराबाहेरील एकूण 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारासाठी शहराबाहेरील 30 रुग्ण दाखल आहेत. महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 91 इतकी आहे.
काहीही झालं तरी शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही ! CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान कोरोनाचा राज्यात चांगलाच संसर्ग झाला आहे. आतापर्यंत 35 हजार 058 जणांना कोरोना झाला आहे. तर त्यापैकी 8 हजार 437 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. तर या कोरोनामुळे आता पर्यंत राज्यातील 1 हजार 249 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन 4 ची घोषणा केली आहे. तर मुंबई – पुण्यासारख्या शहरात यासाठी काही वेगळे नियम लागू केले आहेत.
काय म्हणता ! कामगारांना पूर्ण पगार देण्याचा नियम सरकारच्या नवीन नियमावलीत नाही…
पुणे हे कोरोना संसर्गाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे पुण्यात देखील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन 4मध्ये कडक नियम करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुणे मार्केट यार्ड पूर्णत: बंद राहणार आहे. तसंच भुसार मार्केटही आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दुकानदारांना कोरोनाची बाधा झाल्याने भुसार व्यापारी धास्तावले आहे. त्यामुळे भुसारा व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे मार्केट समिती प्रशासनांची आज व्यापाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे.
#Lockdown_4.0 : असा असणार पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागात लॉकडाऊन
तर पुणे ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी गावपातळीवरील स्वयंघोषित ‘जनता कर्फ्यू’ला चाप लावला आहे. ‘शासनाच्या नियमानुसार, दुकानं सुरू राहितील, कोणताही शासनाच्या आदेशाशिवाय लागू होणार नाही’, असं जिल्ह्याधिकाऱ्यांनी बजावलं आहे. तसंच गावातील क्वारंटाइन सेंटर्समधून सुविधा द्या, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

