🕒 1 min read
भिवंडी: भिवंडीतील कशेळी ते अंजुरफाटा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ताच चांगला नाही मग टोल कशाचा? असा सवालही मनसेने केला आहे.
मनसेने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे अल्टीमेटम २० दिवसांपूर्वी दिला होता. मात्र तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही, अखेर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन मनसे स्टाईलने आंदोलन करत ठाणे-भिवंडी रस्त्यावरील कशेळी टोलनाका लोखंडी रॉड व काठ्यांच्या सहाय्याने फोडला आहे.
यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्थीच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन मनसेने केले होते. या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्यानंतर टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी बंद केला होता. मात्र गुरुवारी टोल वसूल करणाऱ्या सुप्रिम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला. या कंपनीने टोलनाका सुरु केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
आधी रस्ता दुरुस्थ करा, मगच टोल नाका सुरु करा अशा घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. मनसेने या रस्त्याच्या दुरुस्थीसाठी मुंडन आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
