Share

दु:खद! ‘या’ वर्ल्डकप हिरोच्या आईचे कोरोनामुळे निधन

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी अनेक ठिकाणी अशंत: लॉकडाउन लागु करण्यात आले आहे. काही दिवसापुर्वी भाराताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली होती. यात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. तर सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

यादरम्यान २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विश्वविजयात मोलाची भूमिका निभावणारा गोंलदाज हरमित सिंग याच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले आहे. या घटनेमुळे क्रिकेटजगतात शोककळा पसरली आहे. २०१२ १९ वर्षाखालील मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत हरमित सिंगने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याची आई परमजीत कौर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

हरमित सिंगने काही दिवसापुर्वी त्याच्या इंस्टाग्राम या सोशल मीडीयाच्या माध्यमाने एका विशेष इंजेक्शनची मागणी केली होती. हरमितने २००९ मध्ये मुंबई संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनतर त्याने त्रिपुराकडुन खेळला होता. हरमितने फेब्रुवारी २०२० मध्ये आसाम संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. हरमित सिंगने आपल्या कारकीर्दीत एकूण ३१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८७ गडी बाद केले आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ साली राजस्थान रॉयल्स संघात पदार्पण केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!