🕒 1 min read
मुंबई: आजकालच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाचे युगामध्ये लोकांना हसवणे खूप कठीण होत चालले आहे. लोक आपल्या आयुष्यात एवढे मग्न आणि हरवले आहे की, त्यामुळे हसायला विसरले आहेत. अशा परिस्थितीत काही स्टँड-अप कॉमेडियन (Stand-Up Comedian) आहे, जे त्यांच्या स्टाईलने लोकांना हसवू शकतात. झाकीर खान (Zakir Khan) हे एक त्यातले नाव आहे. कॉमेडीच्या दुनियेमध्ये झाकीर खान हे एक असे नाव आहे, कुणीही ते ओळखण्यास नकार देऊ शकत नाही. झाकीर खान त्याच्या व्हिडिओमुळे आणि कॉमेडीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याचबरोबर झाकीरच्या कॉमेडीचे लोकांना सतत वेड लागत असते. अशा परिस्थितीत झाकीर खान आता त्याच्या स्टँड-अप कॉमेडी शो ‘तथास्तु’ (Tathastu) च्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करायला येणार आहे. या मजेशीर शो चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने झाकीर खानच्या खास स्टॅन्ड-अप कॉमेडी शो तथास्तुचा मजेदार ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये झाकीर खान लोकांनी वेढलेल्या स्टेजवर आपल्या खऱ्या आयुष्यातील कॉमेडी करत सर्वांना हसवताना दिसत आहे. य शोमध्ये झाकीर खान आपल्या हलक्याफुलक्या विनोदासोबतच लोकांना समजून सांगत आहे की एकत्र कुटुंबात वाढताना कसे वाटते.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे काळा रंगाचा कुर्ता परिधान करत झाकीर खान स्टेजवर त्याचे वडील आणि मित्रांशी संबंधित विनोद ऐकत आहे. हे विनोद ऐकल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले दिसत आहे. झाकीर खानचा हा खास कॉमेडी शो 31 डिसेंबर पासून ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर स्ट्रीम होणार आहे.
तथास्तुबद्दल झाकीर खान बोलताना म्हणाला की, “तथास्तु माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. हा शो मी माझ्या आजोबांना समर्पित करणार आहे. कारण माझ्या आजोबांकडून शिकलेल्या गोष्टींद्वारे एक जबाबदार व्यक्ती बनण्याचा प्रवास मी प्रेक्षकांपर्यंत शो च्या माध्यमातून घेऊन येत आहे. मला खात्री आहे की हा शो प्रेक्षकांना नक्की आवडेल.”
महत्वाच्या बातम्या
- Sunil Gavaskar | विराट-रोहितने सतत ब्रेक घेतल्यामुळे गावस्कर संतापले, म्हणाले…
- Raj Thackeray | “…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, राज ठाकरेंचा घणाघात
- Narayan Rane | “…तेव्हा नाही का वाटली लाज?”, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर काव्यमय टीका
- Narayan Rane | “बाळासाहेबांना सावकरांबद्दल सन्मान होता तो उद्धव ठाकरेंना आहे का?”; नारायण राणेंचा खोचक सवाल
- Raj Thackeray | “बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील”, राज ठाकरेंचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
