Share

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शिखर धवनने ‘Mission Oxygen’साठी केली २० लाखांची मदत

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने मदतीचा हात पुढे केला आहे.

सलामीवीर शिखरनं ‘Mission Oxygen’साठी २० लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याशिवाय आयपीएलमध्ये मिळणाऱ्या सर्व पुरस्कारांची बक्षीस रक्कमही तो या मोहिमेत देणार आहे.

https://www.instagram.com/p/COSmZiMprh4/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, ”आपण आता अनपेक्षित संकटात आहोत आणि या काळात एकमेकांना शक्य तेवढी मदत करण्याची जबाबदारी आपली आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना अनेक वर्ष तुमचं भरभरून प्रेम मला मिळालं आणि त्याचा मी ऋणी आहे. आता या देशातील लोकांना मदत करण्याची माझी वेळ आहे. मी Mission Oxygen साठी २० लाखांची मदत जाहीर करत आहे. त्याशिवाय आयपीएलमधून मिळणारी बक्षीस रक्कमही मी या मोहिमेत दान करणार आहे.”

”या संकटापासून आपल्याला वाचवणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचे मी आभार मानतो. आम्ही आजन्म तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहणार आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की नियमांचं पालन करा, मास्क घाला, सॅनिटाईज वापरा अन् सामाजिक अंतर राखा. आपण हा लढा जिंकू शकतो,”असेही धवननं लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!