Share

Sushmita Sen and Lalit Modi | ललित मोदींबरोबर लग्नाच्या चर्चांवर सुष्मिता सेन हिची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली …

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत लग्नाची घोषणा केली. ही घोषणा केल्यानंतर काही वेळातच ललित मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी आणि बायो दोन्ही बदलले. तसेच त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सुष्मिताला बेटर हाफ म्हटले. यानंतर ललित यांनी आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिले की, ते फक्त डेट करत आहेत, अजून लग्न केलेले नाही. मात्र ललित आणि सुश्मिताचे हे फोटो व्हायरल होताच सगळीकडे त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या. आतापर्यंत सुष्मिताने त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. मात्र आता पहिल्यांदाच सुष्मिताने या प्रकरणावर भाष्य केले आहे.

सुष्मिताने इंस्टाग्रामवर तिच्या मुलींसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले की, “मी आनंदी आहे, लग्न केलेले नाही आणि कोणतीही अंगठी पण नाही. फक्त निस्वार्थ प्रेम आहे. इतकं स्पष्टीकरण पुरेसं आहे. आता पुन्हा कामावर परतणार आहे. माझ्या आनंदात नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि जे सोबत नाहीत. ते #NOYB आहे”.

https://www.instagram.com/p/CgB8of5tHit/?utm_source=ig_web_copy_link

काय म्हणाला सुष्मिताचा भाऊ?

ललित मोदींच्या ट्विटनंतर एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन म्हणाला की, हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे. मात्र काहीही प्रतिक्रिया देण्याआधी मला माझ्या बहिणीशी बोलायचे आहे. कारण मला याबाबत काहीच कल्पना नाही. माझ्या बहिणीने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही, त्यामुळे मी आताच त्यावर काहीही बोलू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!