🕒 1 min read
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन या दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं.
कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो होम क्वारंटीन राहणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र, आज पुन्हा सचिनने ट्वीट करत वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता हॉस्पिटल मध्ये दाखल होत असल्याचं त्याने म्हटलं आहे. दरम्यान 47 वर्षीय सचिन तेंडुलकरने आपण लवकरच कोविड 19 वर मात करून घरी परतणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारताने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील २ एप्रिल २०११ ला विश्वचषक जिंकला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकाची अंतिम फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर चषक उंचावला होता.
April 2, 2011 – a day when history was created! We wanted to win the WC for India & for the master @sachin_rt who carried the nation’s expectations over decades!
Indebted to be able to represent India & bring glory to our nation ???????? ???????? #AlwaysBleedBlue #WC2011 @ICC @BCCI pic.twitter.com/kCR7pTL6Bx
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 2, 2021
याचनिमित्ताने आज खेळाडू त्या अविस्मरणीय विजयाच्या आठवणी सोशल मीडियावर जागवल्या आहेत. आठवणींना उजाळा देत 2011 च्या विश्वचषकातील बिनीचा शिलेदार युवराज सिंगने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच कोरोनाने बाधित असलेल्या सचिन पाजीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
