Share

करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांची भेट

Published On: 

मुंबई : आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतल्यानंतर करुणा शर्मा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल, असं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशारा करुणा यांनी स्पष्ट केलाय.

महापौरांची भेट घेऊन करुणा यांनी स्वच्छतागृह आणि कचऱ्याचा प्रश्न मांडल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशन्सवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येत असतात, त्याविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.

आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं.

‘गेली २५ वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन,’ असा दावाही करुणा यांनी केला आहे.

पूजा चव्हाण असो की इतर कोणतीही मुलगी, तिला न्याय मिळायलाच हवा. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मीही आत्महत्येचा विचार केला होता. पण मरण्यापेक्षा आपण लढणं पसंत केल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या. इथून पुढे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!