मुंबई : सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजप सरकार मविकास आघाडीसरकार विरोधात आक्रमक झालेलं पहायला मिळत आहे. भाजपचे नेते पत्रकार परीषदा घेऊन ठाकरे सरकारवर हल्ला करताना दिसत आहे. भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परीषद घेऊन सरकार घणाघाती आरोप केले.
शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रीमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी सध्या पोलीस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहेत.
दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरु आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असून लवकरचं सरकारचा बुरखा फाटणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
‘माझी सगळी भाकीत वेळेत पूर्ण होणार नाहीत, त्याला वेळ लागेल. आम्ही कुठं म्हणतोय सरकार पडणार, धोका आहे. आम्ही काहीच म्हणत नाहीय. दोन तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. शोध लागला आहे, आता बुरखे फाटायला वेळ लागणार नाही. कोण कोण पायाखाली येतंय हे रात्रीपर्यंत बाहेर येईल.’ असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परीषदेत केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी बारामतीतून लोकसभा लढविणार’, महादेव जानकरांचा इरादा पक्का
- सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे सूत्रधार शोधा : फडणवीस
- शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर सचिन वाझेचे व्यावयासिक संबंध
- राज्याची चिंता वाढली; तब्बल २० हजारांहून अधिक रुग्णांची आज नव्याने भर !
- मराठी भाषेत नामफलक न लिहिणाऱ्या धार्मिकस्थळांवर कारवाई


