Share

घरांवर बुलडोझर चालवण्याची भाषा केली जात असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते बुलडोझर समोर आडवे येतील!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील नागरिकांना सोईसुविधा पुरवणे मनपा प्रशासनाचे काम आहे . काँग्रेसने केलेल्या मागणीनुसार गुंठेवारी वस्त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने गुंठेवारी नियमितीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र नागरिकांवर दबाव न टाकता त्यांना सवलत देत गुंठेवारी अमलात आणावी अशी भूमिका काँग्रेसची आहे. मनपा प्रशासकांनी गुंठेवारी न भरल्यास १ नोव्हेंबर पासून मालमत्तांवर बुलडोझर चालवण्याची भाषा करणे हे निंदनीय आहे. या वक्तव्याचे काँग्रेस समर्थन करणार नाही. घरांवर बुलडोझर चालवण्याची भाषा केली जात असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते बुलडोझर समोर आडवे येतील. असा इशारा मनपाला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार जनतेचे सरकार आहे. नागरिकांना त्रास देण्याची सरकारची भूमिका नाही. गुंठेवारीचा कायदा २००६ साली विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आला होता. याची आठवण उस्मानी यांनी प्रतिक्रिया देतांना करुन दिली. त्यांचा हेतू मालमत्ता वैध व्हावी, कायदेशीर पुर्तता करून वस्त्यांचा विकास व्हावा. गुंठेवारीच्या पैशातून या वस्त्यांमध्ये सुविधा देण्याचे मनपा प्रशासनाचे कर्तव्य आहे. काँग्रेसची ही मागणी आहे. गुंठेवारीसाठी जे दर लावण्यात आले आहेत गरीबांच्या आवाक्याबाहेर नसायला हवे.

गुंठेवारी फाईल दाखल करण्यासाठी तीन ते चार महीन्यांचा कालावधी देण्यात यावा. हुकुमशाही पध्दतीने प्रशासक निर्णय घेत असल्याची टीका शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केली आहे. अगोदरच नागरिकांचे रोजगार कोरोनामुळे गेलेले आहेत. त्यांच्याकडे सध्या भरायला पैसे नाहीत. जे लोक वर्षानुवर्षे मनपाला कर भरतात त्यांना आठ दिवसाआड पाणी मिळते, रस्ते चांगले नाही, आरोग्य सुविधा मिळत नाही. अशीही टिका उस्मानी यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. सुविधा मिळत नसल्याने अधिका-यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची भाषा काँग्रेस करेल पण आम्ही असे बोलणार नाही कारण येथे कायद्याचे राज्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!