Share

‘जय हो!, काँग्रेस आता अधिक मजबूत होणार’, दाजींच्या घरवापसीच्या निर्णयाने अशोक चव्हाणांना आनंद

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर पाटील खतगांवकर यांनी पक्षाला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. पाटील हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. सात वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत त्यांनी कॉंग्रेस सोडली होती.

पण आता खतगांवकरांच्या या निर्णयाने अशोक चव्हाण आनंदी झालेत. ‘माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह काँग्रेस प्रवेशाची घोषणा करणारे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचेही मी पक्षात स्वागत करतो. त्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल .ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करतो. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयातील पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, याचा मला विश्वास आहे’ असे ट्विट चव्हाण यांनी केले आहे. तसेच सोबतीला ‘जय हो’ असा हॅशटॅगही जोडला आहे.

मराठवाड्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. येथे कॉँग्रेसचे उमेदवार व अंतापूरकरांचे पुत्र जितेश अंतापूरकर आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात लढत होईल. महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.

या मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. अशोक चव्हाणांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर येथून तीनदा कॉँग्रेसचे आमदार होते. त्यांचे चव्हाणांशी बिनसल्यानंतर २०१४ च्या भाजप लाटेत त्यांनी भाजपशी घरोबा केला. पण भाजपने त्यांना पक्षसंघटनेतच गुंतवून ठेवले. प्रदेश उपाध्यक्ष असूनही त्यांच्या सुनेला ते नायगावमधून उमेदवारी देऊ शकले नाहीत. त्यातच आता त्यांना विश्वासात न घेता भाजपने साबणेंना शिवसेनेतून आयात करत उमेदवारी दिली. त्यामुळे ते भाजपावर नाराज होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!