औरंगाबाद : कोविड-१९ महामारी मुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा, प्रशासन, अधिकारी व कर्मचारी हे रोग प्रतिबंध, उपचार व लसीकरणामुळे प्रचंड तणावाखाली आहेत, याचा विचार करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल कॉन्सिल फॉर क्लिनिकल इस्टेब्लिशमेन्ट, दिल्लीचे केंद्रीय सदस्य संतोष नेवपूरकर हे उपस्थित होते. जिल्हा आयुष कक्ष व जिल्हा मध्यम व विस्तार- प्रसिध्दी विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी व जिल्हा क्षयरोग कार्यालयासाठी १२ ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आय.एम.ए. हॉल येथे सकाळी ६ ते ७:३० वाजता निशुल्क योग प्राणायाम व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योग, प्राणायाम, ध्यान व तणाव मुक्ती वर संत जनार्दन स्वामी आश्रम, वेरूळ येथील विश्व विक्रम रचियते योग शिक्षक दिनेश भुतेकर यांनी मार्गदर्शन केले.
तीन दिवस चाललेल्या या योग शिबिराचा समारोप १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. समारोपात संत जनार्दन स्वामी आश्रम, वेरूळ येथील मुख्य प्रशासक रामानंद यांनी दैनंदिन जीवनात व तणाव मुक्ती-रोग मुक्ती साठी योगाभ्यासाच्या महत्वावर मार्गदर्शन केले. या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने योग शिबिराचे समापन राष्ट्रगीत गायनाने झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अर्चना ताथेड यांनी केले तर जिल्हा आयुष अधिकारी तथा जिल्हाविस्तार व मध्यम अधिकारी डॉ. शेख शकील यांनी सर्वांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुंबाला माजी मंत्री आ.संजय राठोड यांच्याकडून आर्थिक मदत
- मांसाहार प्रेमींनी करावा लागणार महागाईचा सामना; चिकन-मटणच्या दरात वाढ
- ‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं’, कांचन गिरींचा हल्लाबोल
- कोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन व्यवस्था सध्या तरी ऑनलाइनच
- ‘शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही’, उर्जामंत्र्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

