Share

लसीचा एक डोस घेतलेल्यांसाठी दिवाळीनंतर नियम होणार शिथिल?, राजेश टोपेंचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण आटोक्यात आल्यानंतर राज्यातील शाळा, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मंदीरे उघडण्यात आली आहेत. तसेच कार्यक्रमांमध्ये जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आता दिवाळी जवळ आल्याने लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असून बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर बोलतांना दिवाळीनंतरही कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली तर, निर्बंध असलेल्या भागात शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात अधिक बोलत ते म्हणाले की,’लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना रेल्वे प्रवास आणि मॉलमध्ये जाता येत नाही. तसेच कोविशील्ड लसीमधील दोन डोसचे अंतर ८४ दिवसांचे आहे. त्यामुळे लोकांना असुविधा होत आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अपमध्ये ज्या व्यक्तीचे स्टेटस सुरक्षित असेल, अशा लोकांना सवलती देता येईल का यासंदर्भात चर्चा केली जाईल. दिवाळीनंतर करोना रुग्णांची आकडेवारी काय असेल, यावरूनच एक डोस असलेल्या लोकांना प्रवासात सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’, असेही यावेळी टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!