Share

युवी आणि हेजलच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन ; सोशल मिडियावरून दिली माहिती

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू असलेला युवराज सिंग आता एक पिता झाला आहे. युवराज आणि त्याची पत्नी हेजल  किचने सोशल मिडियावर पोस्ट टाकत आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची बातमी दिली. त्याच्या या पोस्टखाली शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

युवी आणि हेजलने केलेल्या पोस्टमध्ये लिहले ” आमचे चाहते , मित्रमंडळ आणि परिवाराला सांगण्यास आनंद होत आहे की, आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. यासाठी आम्ही देवाचे खूप खूप आभार मानतो, सोबतच अशी आशा करतो की आमच्या छोट्या पाहुण्याच्या आगमनानंतर आम्ही काही गोष्टी वैयक्तिक ठेऊ इच्छीतो , या निर्णयाचे तुम्ही आदर कराल ”

 

युवी आणि हेजल यांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. युवी आणि हेजलने अचानक दिलेल्या या गोड बातमीने चाहत्याना सुखद धक्का दिला आहे. हेजल एक अभिनेत्री आहे. तिने सलमानच्या ‘ बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे क्रिकेट सोबतच बॉलीवूड जगतानेही या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!