औरंगाबाद : विविध सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर सफाई कामगार पुरवणाऱ्या बीव्हीजीच्या कार्यालयात गुरुवारी औरंगाबाद युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोडीची घटना घडली. बीव्हीजी कंपनीने 24 तासांच्या आत सफाई कामगारांचे थकीत वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली.
सफाई कामगार पुरवणाऱ्या बीव्हीजीचे कार्यालय खोकडपुरा भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आहे. मागच्या 8 महिन्यांपासून बीव्हीजी कंपनीने कामगारांचे वेतन दिलेले नाही, अशी तक्रार या कामगारांनी युवक काँग्रेसकडे केली होती. यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बीव्हीजी कार्यालय गाठून त्यांना वेतनासंबंधीचा जाब विचारला. यानंतर येथे कार्यकर्त्यांकडून फर्निचरची तोडफोड करण्यात आली.
https://www.facebook.com/nilesh.ambewadikar/posts/3798283006898666
यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फरखान पठाण, डॉ. नीलेश आंबेवाडीकर, अब्दुल अजीम, सलीम शेख, विजय कांबळे, मयूर साठे, सचिन सकट, आकाश रगडे, अमोल थोरात, योगेश बहादुरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- अर्नब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा, उद्या कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरम इंस्टिट्युटमध्ये आग; अदर पुनावाला यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

