मुंबई : गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. महत्वाचे म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारीच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली आणि त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.
यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शुक्रवारी भाजप सरकारवर टीका केली आहे. ‘ही राजकीय छापेमारी आहे. ईडी असेल किंवा आयकर विभाग असेल किंवा सीबीआय असेल, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात छापेमारी आणि धाडसत्र सुरू आहे. ते सूडाचं राजकारण आहे. आज ज्या संस्था सूडानं वागत आहेत त्यांनी लक्षात घ्यावं की, अपना टाईम भी आयेगा, असे वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज अजित पवार यांनीही या कारवाईवर भाष्य केले आहे. ;पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत. त्यांचे काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला जे बोलायचे होते ते बोलेन. आता ते घरी आणि वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आहेत. ते जेव्हा जातील तेव्हा मला जी भूमिका मांडायची आहे ती मी मांडेन आणि जे नियमानुसार आहे ते जनतेच्या समोर येईल. त्यात घाबरण्यासारखे काही कारण नाही’ असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं


