🕒 1 min read
मुंबई : मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून काल गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. काल सकाळपासून आयकर विभागाची पथके यावर तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर भाष्य केले करत या कारवाया म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण असल्याचं म्हणाले होते. त्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी पवार कुटुंबावर टीका केली आहे.
पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले हे पुरावे सहित यंत्रणांकडे पोहोचलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल, ही तर सुरुवात आहे. साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार, असं म्हणत निलेश राणेंनी पवार कुटुंबावर टीका केली.
पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले हे पुरावे सहित यंत्रणांकडे पोहोचलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल, ही तर सुरुवात आहे. साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार. pic.twitter.com/yG5ZAlU8VN
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 8, 2021
55 सहकारी कारखान्यांचे खासगीकरण करून प्रायव्हेट कंपन्यां मार्फत कवडीमोल किमतीला कारखाने विकत घेतले आणि अजित पवार म्हणतात माझी चूक काय? स्व. बाळासाहेब म्हणाले होते पवारांचे खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतील, ते सिद्ध झाले, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
55 सहकारी कारखान्यांचे खासगीकरण करून प्रायव्हेट कंपन्यां मार्फत कवडीमोल किमतीला कारखाने विकत घेतले आणि अजित पवार म्हणतात माझी चूक काय? स्व. बाळासाहेब म्हणाले होते पवारांचे खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतील, ते सिद्ध झाले. pic.twitter.com/HhRLr98ysM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 8, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दादरा नगर हवेली शिवसेनाच जिंकणार, संजय राऊतांचा दावा’
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- गेला परमबीर कुण्या गावा! ‘माजी पोलीस आयुक्तांचा ठावठिकाणा माहित नाही’, सीआयडीचा आयोगासमोर अहवाल
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
