मुंबई : भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. पाच वर्षांपूर्वी हे प्रकरण इतके बिघडले होते, की कुंबळेला आपले पद सोडावे लागले होते. आता या वादाबद्दल माजी कॅग विनोद राय यांनी एका पुस्तकाच्या माध्यमातून मोठा खुलासा केला आहे. २०१७ मध्ये, सुप्रीम कोर्टाने राय यांना प्रशासकीय समितीचे (COA) प्रमुख बनवले होते, ज्यांनी भारतीय क्रिकेटला जवळपास तीन वर्षे चालवले.
विनोद राय यांनी त्यांच्या ‘नॉट जस्ट अ नाईटवॉचमन: माय इनिंग्स इन द बीसीसीआय’ या पुस्तकात विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील नात्याबद्दल लिहिले आहे. “कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी झालेल्या माझ्या संभाषणात असे निदर्शनास आले, की कुंबळे शिस्तीच्या बाबतीत खूप कठोर होता आणि त्यामुळे संघाचे सदस्य त्याच्यावर फारसे खूश नव्हते. मी या विषयावर विराट कोहलीशी बोललो आणि त्याने असेही सांगितले, की कुंबळेच्या वागण्याने संघातील तरुण सदस्य खूप घाबरायचे.”
कुंबळेने सीओएला सांगितले, की त्याने संघाचे हित शीर्षस्थानी ठेवून काम केले आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्या रेकॉर्डला खेळाडूंच्या कथित तक्रारींपेक्षा अधिक महत्त्व दिले पाहिजे.
२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळेशी केलेल्या प्रदीर्घ संभाषणाचा राय यांनी संदर्भ दिला आहे. त्यांनी लिहिले, “कुंबळे ब्रिटनमधून परतल्यानंतर क्रिकेट प्रशासकांच्या समितीने त्याच्याशी संभाषण केले. हे संपूर्ण प्रकरण ज्याप्रकारे समोर आणण्यात आले त्यामुळे कुंबळे नाराज झाला. आपल्याला वाईट वागणूक दिली गेली आणि कर्णधार किंवा संघाला इतके महत्त्व दिले जाऊ नये, असे त्याला वाटले. संघात शिस्त आणि व्यावसायिकता रुजवणे ही प्रशिक्षकाची जबाबदारी होती आणि वरिष्ठ खेळाडू असल्याने त्यांच्या विचारांचा आणि विचारांचा आदर करायला हवा होता.”
महत्त्वाच्या बातम्या –
- “…तर पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा राज ठाकरेंना बेड्या ठोका”, ‘वंचित’ची आक्रमक भूमिका
- IPL 2022 RR vs RCB : विराट विरुद्ध चहल; दोन संघांपैकी कोणाचं पारडं जड? वाचा!
- ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाहचं पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक
- IPL 2022: राहुलची फिफ्टी ते हैदराबादचा पराभव; SRH vs LSG सामन्यात रचले गेले ‘असे’ अनेक रेकॉर्ड्स !
- “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

