मुंबई : या सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच हे सरकार लवकरच पडेल अशी टीका भाजप नेत्यांनी पुन्हा सुरु केल्याचं दिसून येत आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो’ असं विधान रावसाहेब दानवे यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करून दिला.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी असा दावा केल्यानंतर त्याला आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपाचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पहात रहावीत, असा टोला थोरात यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला.
तसेच मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्यांचे काय झाले, हे आपण पहातच आहोत. महाराष्ट्रात भाजपाचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षाचा कार्यकाळ ही पूर्ण करू असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- भाजपने आणखी एक घर फोडलं, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यावर नेटकरी नाराजच, डिसलाइक्सचा नवा विक्रम होण्याची शक्यता
- ‘केंद्राची महाराष्ट्राला सापत्न वागणूक मदत देणे तर दूरच, नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथकही पाठवले नाही’
- मी कोणासोबत आहे हेच कळेना; ‘या’ शिवसेना खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!
- अंगावर आलं की बोंबलायचं ही शिवसेनेच्या नेत्यांची सवयंच – गोपीचंद पडळकर

