🕒 1 min read
दिल्ली : इयत्ता बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली आहेत. ती विचारात घेऊन येत्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं होतं. दरम्यान, CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. आजच याबाबत अंतिम निर्णय येणं अपेक्षित होतं. पण ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल असं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे दोन दिवसांचा वेळ देण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्टानं ही विनंती मान्य करत याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका ऍड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर आता गुरुवारी सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे करोडो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- जडेजाच्या खेळीवर सातत्याने होत होत्या टीका ; धोनीने केली ‘अशी’ मदत
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

