🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले होते की, शक्ती कायद्याच्या संदर्भातील जे विधेयक ज्यॉईट समितीकडे पाठवण्यात आलेलं होतं. त्याचं कामकाज पुर्ण झालेलं आहे. त्यामुळे आज विधानसभेत ज्यॉईट कमिटीचा अहवाल आम्ही सादर करणार आहोत. त्यानंतर या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात शक्ती कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल.’ दरम्यान, याच मुद्द्यावर आता विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे(Nilam Gorhe) यांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शक्ती विधयकासंबंधी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. तसेच शक्ती विधायकासाठी आपल्याला कल्पना आहे की , विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्हीच्या सदस्यांची चिकित्सा समिती नेमलेली होती. त्यानुसार त्याचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे आणि ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षांचं प्रतिबिंब तुम्हाला त्या विधेयकात दिसेल. आणि महत्वाचे म्हणजे लवकरच आरोपींना शिक्षा आणि त्याचबरोबर महिलांची मदत आणि पुनर्वसन वेळेत व्हावं त्याचबरोबर ऍसिड अटॅक असेल, सायबर क्राईम असतील याप्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हल्ल्यांचा सुद्धा या विधेयकामध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’आमची अशी अपेक्षा आहे की, हे विधेयक लवकर मंजूर व्हावे आणि केंद्र सरकारने त्याला लवकरात-लवकर मान्यता द्यावी.
महत्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
