टीम महाराष्ट्र देशा:आजकाल सोशल मीडियावर लहान मुलांचे आणि पाळीव प्राण्यांचे अनेक क्यूट व्हिडिओ पाहायला मिळतात. युजरच्या पसंतीमुळे ते व्हिडिओ वेगाने व्हायरल देखील होतात. हे क्युट आणि निरागस व्हिडिओ लोकांचे खूप मनोरंजन करत असतात. आणि जेव्हा लहान मुले आणि पाळीव प्राणी यांचा एका व्हिडिओमध्ये समावेश होतो तेव्हा तो व्हिडिओ तर लोकांना अजूनच जास्त आवडतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जो लोकांना खूप जास्त आवडला आहे.
सिंहासोबत खेळताना लहान मुलगा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर वायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लहान मुलगा सिंहासोबत खेळताना दिसत आहे. खरंतर हे दृश्य एका प्राणी संग्रहालयातील आहे, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक सिंह शांततेत बसलेला दिसत आहे आणि त्याच्या बाजूला ते लहान मुल त्याच्याशी खेळताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षरित्या आहे असे नसून सिंह आणि त्या लहान मुलांच्या मध्ये एक जाड काच बसवलेली आहे. त्यामुळे आपल्याला ते दोघे एकत्र असल्याचा भास आपल्याला होत आहे. या व्हिडिओमध्ये सिंह सुद्धा या मुलासोबत खेळण्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | लहान मुलाला सिंहासोबत खेळताना बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ pic.twitter.com/9sNVjamSh5
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 4, 2022
व्हायरल व्हिडिओ
इंस्टाग्राम वर travelworldxl या पेज वरून हा मनोरंजक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘This is so cute’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ खरच खूप क्युट असून या व्हिडिओला 3.2M पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- NCP | “गेल्या ११ महिन्यांपासून…” ; अनिल देशमुखांचा जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
- Cabinet meeting । शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील ७ कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट पॅकेज जाहीर
- Viral Video | सायकलवर बसून केले शास्त्रीय नृत्य, मुलीचा डान्स बघून व्हाल थक्क!
- Supriya Sule | “सत्याचा अखेर विजय झाला आहे”; देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांसाठी शिंदे गटाने दिली ‘इतके’ लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

