Share

निवडणूक आली की आठवतो शिक्षक, कोरोना झाला की आठवतो शिक्षक…तुम्हीच सांगा साहेब आम्ही कोणते काम करायचे?

Published On: 

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे सध्या राज्यभरातील सर्वच शाळा बंद आहेत. परंतु, अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शिक्षकांना हे काम करणे क्रमप्राप्त ठरते. परंतु, नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील तहसीलदार शिक्षकांना वेगवेगळय़ा कामामध्ये गुंतवित आहेत. त्यामुळे आता शिक्षकांनी नेमके कोणते कार्य करायचे? असा सवाल उपस्थित करून गुरुवारला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना ‘ऑनलाईन’ निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी संघटनेने कुंभेजकर यांना निवेदनाद्वारे सांगितले की, रामटेक तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख सध्या विविध आदेशान्वये कोविड – १९ व शैक्षणिक कार्यामध्ये गुंतलेले आहेत. गटशिक्षणाधिकारी रामटेक व तहसीलदार रामटेक यांच्या आदेशान्वये शिक्षक कोविड – १९ चा निरंतर सर्व्हे, खासगी दवाखान्यात उपस्थित राहून कोरोना रुग्णांची माहिती घेणे, ऑनलाईन शिक्षण देणे, गृहभेटीतून विद्यार्थ्यांचे गृहकार्य तपासणे, स्वयंसेवकांमार्फत शिक्षण सुरू ठेवणे आदी कार्य करीत आहेत. शिवाय गटशिक्षणाधिकारी रामटेक यांच्या २ सप्टेंबर २0२0 च्या पत्रान्वये शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेत उपस्थित राहून शैक्षणिक कार्य करावे व १0 ऑगस्ट २0२0 च्या पत्रानुसार केंद्रप्रमुखांनी शाळा भेटी करुन सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याचा अहवाल गटशिक्षणाधिकार्‍यांकडे सादर करावा असे पत्र दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयानेही घेतली कोरोना संकटात अपुऱ्या सुविधांच्या वृत्ताची दखल, ‘या’ शहरातील आहे प्रकरण

कोविड-१९ चा वाढता उद्रेक लक्षात घेता शाळा सुरू ठेवणे याबाबत शासन स्तरावरुन कुठलेही पत्र नाही. गटशिक्षणाधिकारी रामटेक यांनी शिक्षणाधिकार्‍यांच्या ११ सप्टेंबर २0२0 पत्राचा संदर्भ दिलेला आहे. जेव्हाकी ११ सप्टेंबर २0२0 ही तारीख यायचीच असून, ते चुकीचे असल्याचे निदर्शनास येत असल्याचे संघटनेचे म्हणने आहे.

जायकवाडी धरणाच्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू…

याशिवाय शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून शैक्षणिक कार्य कसे करावे? केंद्रप्रमुखंनी शाळा भेटी कश्या कराव्या? नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करावे, याबाबत शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे रामटेक गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांना स्पष्टपणे निर्देश देऊन त्यांच्यातील संभ्रम दुर करावा, अशीही मागणी संघटनेचे राज्य प्रतिनिधी भूपेश चव्हाण, प्रमोद लोन्हारे, टेमराज माले, रामकृष्ण ढोके आदींनी निवेदनाद्वारे केली.

मुंबईत आल्यानंतर कंगनाचं थोबाड फोडू: शिवसेना आमदाराचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!