औरंगाबाद: जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे लवकरच नाथसागर १०० % भरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. आता धरणाची पाणी पातळी ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने धरण १०० टक्के भरेल यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्र मधून होत असलेला पाऊस आणि वरील धरणांमधून जायकवाड़ी मध्ये ११ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर याआधीच प्रशासनाच्या वतीने गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्र बरोबरच लाभक्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या खालील भागातील बंधारे जवळपास पाण्याने तुडुंब भरले आहेत यामध्ये आपेगाव ९ ३.८५ टक्के हिरडपुरी ८१.९ १ टक्के जोगलादेवी ९३.९२ टक्के मंगरूळ ९ ७.६३ % राजाटाकळी ९ ०.५४ % लोणीसावंगी ९ १.०७ टक्के ढालेगाव ६७.०६ टक्के या प्रमाणे पूर्ण क्षमतेने भरण्यास थोड्याच पाण्याची गरज आहे.
मुंबईत आल्यानंतर कंगनाचं थोबाड फोडू: शिवसेना आमदाराचा इशारा
यात प्रामुख्याने पैठण तालुक्यातील आपेगाव येथील बंधारा ही आता पावसाच्या पाण्यावर भरत आहे. त्यामुळे या परिसरातील गावातील पिण्याच्या शेती सिंचनाचा प्रश्न सुटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने गोदाकाठच्या गावात दवंडी देवुन गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये किंवा आपली जनावरे, मालमत्ता नदीपात्रात घेऊन जाऊ नये, आपापल्या जीविताचे व मालमत्तेचे स्वसंरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
मुंबई मराठी माणसाचीच, मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा : संजय राऊत


