Share

मुंबई उच्च न्यायालयानेही घेतली कोरोना संकटात अपुऱ्या सुविधांच्या वृत्ताची दखल, ‘या’ शहरातील आहे प्रकरण

Published On: 

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा असल्याच्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या विविध वयोगटातील रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार उपचार मिळणे आवश्यक आहे. परंतु, अशाप्रकारच्या उपचाराचा प्रोटोकॉल तयार झालेला नाही. निश्चित स्वरुपाचा नसला तरी ढोबळमानाने प्रोटोकॉल तयार होणे आवश्यक असल्याने या क्षेत्रातील पाच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी तज्ज्ञांची नावे सूचवावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.

याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून ऍड श्रीरंग भांडारकर यांची नेमणूक केली. दरम्यान, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना वॉर्डमधील अस्वच्छता, याचीही दखल खंडपीठाने घेतली. रुग्णांना अत्यंत अस्वच्छ वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यांना घाणेरडे बाथरुम व प्रसाधनगृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे तेथील साधन सुविधांचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने नमूद केले.

जायकवाडी धरणाच्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू…

कोरोना आजाराच्या विविध टप्प्यावर कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे, ते देखील जाहीर करायला हवे. त्यामुळेच पाच तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येत असून त्या समितीने कोरोना उपचाराचा प्रोटोकॉल निश्चित करावा. त्या पाच जणांची नावे संबंधितांनी ७ सप्टेंबरपयर्ंत सादर करावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. कोरोना रुग्णांना त्यांच्या आजाराच्या विविध टप्प्यानुसार आणि लक्षणानुसार विभागणी करणे आवश्यक आहे.

मुंबईत आल्यानंतर कंगनाचं थोबाड फोडू: शिवसेना आमदाराचा इशारा

कोरोनाची काहींना लक्षणे दिसतात, तर काहींना दिसत नाही. त्यामुळे विविध वयोगटाच्या आणि लक्षणांच्या आधारे त्यांची विभागणी करून कमी लक्षणे ते गंभीर प्रकृती या टप्प्यावर नेमक्या उपचाराचा प्रोटोकॉल निश्चित करायला आणि तो जाहीर करणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय आर. के. देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

मुंबई मराठी माणसाचीच, मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा : संजय राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!