Share

‘तुला थोडी तरी लाज वाटायला हवी….,’ दिलजीतनंतर मिका सिंगने कंगनावर डागली टीकेची तोफ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं की, ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’.कंगनाच्या या ट्विट मुळे सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत होता या ट्विट मुळे कंगना बरीच ट्रोल झाली नंतर कंगना कडून हे ट्विट डिलीट करण्यात आले होते.

याच मुद्द्यावरून अभिनेता व गायक दिलजीत दोसांजने कंगनाला सुनावले दलजितने ट्विट केले होते कि, ‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’अशा शब्दांत त्याने एक व्हिडीओ शेअर करत दिलजीतने कंगनाला फटकारले. यांनतर कंगना आणि दलजित मध्ये ट्विट युद्ध चांगलेच पेटले होत. दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद पाहायला मिळाला.

दिलजीत दोसांजने कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटवरुन तिला धारेवर धरत चांगलेच खडेबोल सुनावल्यानंतर आता कंगनाविरोधात गायक मिका सिंग यानेही संताप व्यक्त केला आहे. तुला थोडी तरी लाज वाटायला हवी होती आणि तुझ्यात आता ही थोडे फार शिष्टाचार असतील तर त्या शेतकरी आजींची माफी माग, असे मिका सिंगने म्हटले आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरुन मिकाने दोन वृद्ध आजींचा फोटो शेअर केला आहे. कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉटही त्या फोटोवर आहे. मिकाने या ट्विटसोबत, कंगनासाठी माझ्या मनात खूप आदर होता. ज्यावेळी तिच्या ऑफिसवर महानगरपालिकेने कारवाई केली होती त्यावेळी तिच्या समर्थनार्थ मी ट्विटही केले होते.

पण आता मला असे वाटत आहे की त्यावेळी मी चुकीचा होतो. कंगना स्वतः एक महिला असल्यामुळे तू त्या वृद्ध महिलेबद्दल थोडातरी आदर ठेवायला हवा. लाज वाटली पाहिजे तुला.. आणि तुझ्यात थोडे फार शिष्टाचार असतील तर त्या आजींची माफी माग, अशी संतप्त प्रतिक्रिया मिकाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!