🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहर हे राज्याची पर्यटन राजधानी म्हणुन प्रसिद्ध आहे. शहरात अनेक निसर्गरम्य परिसर आहेत जिथे शहरातील नागरिक शनिवारी-रविवारी फिरायला जातात. पण प्रत्येक वेळी हे लोक तिथे काही तरी विसरुन येतात. विसरतात कारण त्यांची गरज संपलेली असते. म्हणुन येताना सोबत घेऊन येतात पण माघारी जाताना तिथेच सोडुन देतात. काय सोडुन देतात माहीत आहे. ते सोडुन जातात ‘प्लास्टिक’
प्लास्टिक हा निसर्गाचा शत्रु आहे, वगैरे वगैरे वसुधंरा दिनी फोटो, स्टेटस शेअर केल की झांल बस्स.. यापलीकडे जाऊन कधी कोणी करत नाही. पण प्लोगर्स औरंगाबाद नावाची एक संस्था शहरात पुढे आली आहे. आपले शहर स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त बनवण्याची इच्छा असलेले हे काही मुलं प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कुठे तर ट्रेकिंग ला जातात आणि प्लास्टिक गोळा करतात. हे निसर्गप्रेमी त्यांच्या शरीरासोबत निसर्गाचीही काळजी घेत आहेत. ‘औरंगाबद प्लोगर्स’ नावाने ओळखला जाणारा हा ग्रुप आता पर्यंत गोगा बाबा, हनुमान टेकडी, औरंगाबाद लेणी, वाल्मी तलाव सातारा परिसर अश्या अनेक ट्रेकिंग सारख्या ठिकाणी गेला आहे. या जागांवरुन या ग्रुपने १००० किलो पेक्षा जास्त प्लास्टिक गोळा केले आहे. हे तेच प्लास्टिक आहे जे इतर सुशिक्षित नागरिक तेथे विसरुन जातात.
प्लॉगींग हि स्वीडन देशातील संकल्पना आहे. प्लॉगींग म्हणजे जॉगिंग किंवा ट्रेकिंग ला जात असताना सोबत एक बॅग ठेवायची आणि रस्त्यात जे प्लास्टिक भेटेल ते उचलून घ्यायचे. याने आपले शरीर ही स्वस्थ राहील आणि निसर्गातून प्लास्टिक ही कमी होईल. ‘औरंगाबाद प्लॉगर्स’ औरंगाबाद मधील वाढत्या प्लास्टिक कचऱ्याला बघून हा उपक्रम चालू करण्यात आला असून आता पर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी प्लॉगींग केली आहे. जेणे करून आम्हाला बघून लोक त्या ठिकाणी प्लास्टिक टाकताना विचार करतील आणि ते बॉटल किंवा रॅपर कचरापेटीत टाकतील, असे औरंगाबाद प्लोगर्स चे संस्थापक निखिल खंडेलवाल यांनी सांगितले. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी उठून हे प्लॉगींगला जात असतात. ‘पुणे प्लॉगर्स’ चे संस्थापक विवेक गुरव यांच्या मार्गदर्शनात शहरातील काही मुलं इथे प्लॉगींग करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना अन् आता कर्णधार कोहलीला आणखी एक धक्का !
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- 2025 सालापर्यंत अपघातांच्या प्रमाणात भारतात 50% घट होणार ?


