Share

‘तू लढ हेमांगी‘; ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला प्रविण तरडेचा पाठिंबा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंगी तिच्या विनोदी अंदाजामुळे लोकप्रिय आहे. तिच्या याच अंदाजामध्ये ती सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले. मात्र या ट्रोल करणाऱ्यांना तिने चांगलेच उत्तर दिले आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टनंतर तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. यातच आता अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी देखील हेमांगीला पाठिंबा दर्शवत प्रतिक्रिया दिली आहे.

हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या शिर्षकाखाली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. ‘विचार म्हणून खतरनाक ऽऽऽऽ.. लेखन म्हणून वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी” अशी कमेंट त्यांनीहेमांगीच्या पोस्टवर केली आहे.

https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/4685927061426886

हेमांगीने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले कि, ‘ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!
आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!

पुढे ती म्हणते की, Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी! ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?, असे परखडपणे हेमांगी म्हणाली आहे. यावर अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!