🕒 1 min read
पुणे : विकासाचा वेग वाढवायचा असेल तर आपल्याला माणसं जोडावी लागतील म्हणून बुथ सक्षम करा. वैचारिक सैन्य सोबत असेल तर आपला पराभव कोणीही करू शकत नाही असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा आजचा तिसरा दिवस असून उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकी दरम्यान ते बोलत होते.
‘राज्यमंत्री संजय बनसोडे यांना आदरणीय खा. शरद पवारसाहेबांनी मंत्रीपद देऊ केले. एकप्रकारे हे उदगीर, जळकोट येथील कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. अनेक वर्ष या मतदारसंघाचा विकास खुंटलेला होता. त्याला गती देण्याचे काम आता महाविकास आघाडी करत आहे. उदगीर आणि अहमदपूर या विधानसभा मतदारसंघात बुथ कमिट्या मजबूत होत्या म्हणून आपल्याला हा विजय खेचून आणता आला’, असेही जयंत पाटील म्हणाले.
आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने आपण चालतो आहे. म्हणून तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला हवे. प्रत्येक आजाराचे आपणच औषध नाही. पण प्रयत्न करायला हवा, म्हणून प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
या आढावा बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, महम्मद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल खय्युम खान, नगराध्यक्ष असफर शेख, प्रदेश सरचिटणीस आशा भिसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, निरीक्षक वसंत सुगावे, संजय शेट्टी, मराठवाडा निरीक्षक प्रज्ञाताई खोसरे, जिल्हाध्यक्ष मिनाक्षी शिंगडे, युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील, युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका लद्दे हे उपस्थित होते.
- महत्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
