Share

Travel Guide | नोव्हेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर (November) महिना येताच आपण फिरायला (Travel) जाण्याची प्लॅन करायला लागतो. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये फिरण्यासाठी सर्वात अनुकूल वातावरण असतो. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये अनेक लोक आपल्या जोडीदारासोबत फिरायला बाहेर पडतात. कारण जोडप्यांना फिरायला जाण्यासाठी नोव्हेंबरमध्ये उत्तम वातावरण असते. तुम्ही जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नोव्हेंबर महिन्यात फिरायला जायचं प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या जोडीदारांसोबत नोव्हेंबरमध्ये फिरायला जाण्यासाठी काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

हिवाळ्यामध्ये खालील ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला (Travel) जाऊ शकता

कूर्ग

दक्षिण भारतातील सर्वात सुंदर शहरांमध्ये कूर्ग या शहराचे गणना केली जाते. कूर्गला कॉफीचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. कारण या ठिकाणी तुम्हाला सुंदर कॉफीचे मळे बघायला मिळतील. कूर्गला नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यात येतात. त्याचबरोबर कूर्ग एक रोमँटिक डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. म्हणूनच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कूर्ग तुमच्यासाठी एक उत्तम जागा ठरू शकते.

हंपी

जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदार इतिहास प्रेमी असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर तुमच्यासाठी हंपी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. विजयनगरची राजधानी असलेल्या हंपी या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवू शकतात. त्याचबरोबर हंपीमध्ये सूर्यास्ताचा अविस्मरणीय अनुभव तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घेऊ शकता.

मुन्नार

भारतातील केरळ राज्यातील मुन्नार हे शहर निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. केरळ राज्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी समुद्रसपाटीपासून सोळाशे मीटर उंच स्थित असलेले मुन्नार हे एक शहर आहे. मुन्नार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चहाची लागवड केली जाते. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत ती गार्डनमध्ये परफेक्ट फोटोशूट करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!