🕒 1 min read
Abdul Sattar | मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सत्तार म्हणाले, “मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो होते. सुप्रिया सुळे यांचे तसेच कोणत्याही महिलेचे मन दुखेल असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही,” असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलंय.
माझ्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचं ते म्हणालेत. “मी फक्त खोक्यांबद्दल बोललो. माझ्या वक्तव्याचा संबंध महिलांशी जोडला जात आहे. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. यापुढेही बोलणार नाही. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मिही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे,” असंही सत्तार यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार? (Abdul Sattar)
तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही काय सांगाल? असं अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिलीय. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं असल्याचा हा व्हिडीओ आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “…नाहीतर महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल” ; अमोल मिटकरींचा अब्दुल सत्तारांना इशारा
- NCP । वादग्रस्त विधानानंतर सत्तारांच्या घरावर दगडफेक; NCP कार्यकर्ते आक्रमक
- Winter Care Tips | हिवाळ्यामध्ये ड्राय स्किनची समस्या निर्माण होत असेल तर करा ‘या’ पद्धती फॉलो
- Pankaja Munde | अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “टीकेची पातळी घसरत असेल तर…”
- Abdul Sattar vs NCP | “अब्दुल सत्तार भिकाऱ्यांच्या यादीत, जीभ छाटू” ; सुप्रिया सुळेंना शिवी दिल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

